Breaking News

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 2023

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja, Kusum solar pump yojana maharashtra 2023 online Apply 3HP Solar Pump, 5 HP solar Pump, 7.5 HP solar Pump

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील.

ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. kusum solar pump yojana maharashtra 2023-24 खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 

महाऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम योजना

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टये

  • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. (www.mahaurja.com registration)
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार.
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
  • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय 

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे ठळक निकष 2023

  1. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
  2. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. ‘Kusum Solar Pump Yojana’
  3. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
  4. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय

PM Kusum Yojana Documents 2023

  • 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत – Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती?

प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)

शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली क्कम भरावयाची आहे,  शेतकर्यांना अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

3HP (एच.पी.)

  • खुला – 19,380/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-

5 HP (एच पी)

  • खुला – 26,975/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-

7.5HP  (एच.पी.)

  • खुला -37,440/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-

अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.

Mahaurja Kusum Solar Pump Component “B”

  • या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
  • सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचेOn-line  अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
  • यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 3 HP, 5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 5 HP व त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja
  • सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)
  • पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार. ‘Kusum Solar Pump Yojana Maharashtra’
  • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय  सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
  • एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
  • सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

  1. आपण उपरोक्त देय रक्कम महाऊर्जाकडे त्वरित जमा करावी. यासाठी आपण आपल्या लाभार्थी क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन रक्कम जमा करू शकता.
  2. या quotation ( तपशील ) च्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.
  3. आपण दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे अधीन राहून आपला अर्ज मान्य करण्यात आला आहे.
  4. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर निकषात न बसणारे प्रस्ताव रद्द करणेत येणार असून त्यासाठी जमा केलेली रक्कम आपण सादर केलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  5. याबाबत आपल्याशी कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. “Kusum Solar Pump Yojana Maharashtra”

कुसुम सौर कृषी पंप योजना घोषणा

  1. कुसुम सौर कृषिपंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जल स्त्रोताची खोली अर्ज नमुना अर्ज ए 1 मध्ये नमूद केल्यानुसारच आहे.
  2. चुकीची पाणी पातळी नमूद केलेमुळे पंप चालत नसेल तर, त्यास महाऊर्जा कार्यालय | पुरवठाधारक जबाबदार राहणार नाही. याची मला जाणीव आहे.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी सौर पंपाच्या किंमतीचा लाभार्थी हिस्सा10 टक्के (अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 टक्के) भरणेस मी तयार आहे. ‘Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja’
  4. सौर पंपाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे याची मला जाणीव करुन दिलेली असून अशी किंमतीचा वाढीव हिस्स्याची रक्कम भरण्यास मी तयार आहे.
  5. सौरपंपाच्या दररोजची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मी जबाबदार आहे. मी ज्या ठिकाणी सोलर पंपाची मागणी केली आहे तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही. मिळालेल्या सौर पंपाचे रक्षण करणे हि माझी जबाबदारी आहे ह्याची मला जाणीव आहे.
  6. मी सौर पंप बसविण्याकरिता माझ्या शेतजमिनीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यास बांधिल आहे. Mahaurja Kusum Solar pump
  7. तसेच सौर तपासणीसाठी मी अधिकारी, वेळोवेळी दुरुस्ती कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन. त्यात अडथळा आणणार नाही किंवा अडथळा आणू देणार नाही.
  8. या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या शेततळे / विंधन विहीर (बोअरवेल)/ विहीर वर व ज्या सव्र्हे क्र / गट क्रमांक) क्रमांकामध्ये सौर पंप आस्थापित केला आहे, त्या ठिकाणीच कायमस्वरुपी ठेवणार असल्याची हमी देत आहे. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja
  9. त्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मला महाऊर्जा कडून लेखी परवानगी (नाहरकत प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक आहे आणि मी आज याची हमी देत आहे.

अटी-नियम व शर्ती

  1. मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण, विक्री, तांत्रिक बदल करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.
  2. सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास घटना घडलेपासून मी प्रथम माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी घेईन.
  3. मुदतीत असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला जाणीव आहे.
  4. सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप नादुरूस्त झाल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे. “kusum mahaurja com”
  5. या कालावधीत पंप नादुरूस्त झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे.
  6. मी या सौर पंपाच्या स्थापित रचनेमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस मी जबाबदार राहील,
  7. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही.
  8. महावितरणकडून पारंपरिक वीज खरेदी बंधन (आरपीओ) अंतर्गत या सौर पंपाद्वारे निर्माण झालेली सौर उर्जा या बंधपूर्ततेसाठी वापरण्यास मी मान्यता देतो. वरील सर्व नियम व शर्ती माझ्या तसेच माझ्या वारसांवर बंधनकारक असतील.
  9. आज मी रोजी सौर पंपाचे मिळणेसाठी हे हमीपत्र राजीखुशीने देत आहे.
  10. वरील माहिती मला समजली असून / मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे.

महत्वाची सूचना/माहिती वाचा

  1.  सेफ लिस्ट मध्ये नाव नसेल तरी अर्ज करू शकता त्यासाठी डिझेल पंप वापरत आहे होय वरती क्लिक करून अर्ज भरता येईल.
  2. अर्ज पूर्ण भरल्यावर पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील त्यासाठी कोटेशन वाचून घ्या त्यावर सर्व माहिती दिली आहे.
  3. जर अर्ज रेजेक्ट झाला तर पैसे पुन्हा बँक मध्ये जमा केले जातील. “kusum mahaurja registration” Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja

कुसुम सोलर पंप योजनेला किती अनुदान मिळेल?

कुसुम सोलर पंप योजनेला 90 ते 95 % आहे म्हणजेच तुम्हाला 5 ते 10% रक्कम भरावी लागते.

कुसुम सोलर योजनेची नोंदणी कशी करावी?

तुम्ही तुमचा अर्ज माझी नोकरी द्वारे भरू शकता त्यासाठी 

संपर्क करा 7020710142

येथे क्लिक करा

Share this:

Check Also

(AIIA) अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती 2024

All India Institute Of Ayurveda (AIIA), New Delhi AIIA Bharti 2024 for 125 Non Teaching …

(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 89 जागांची भरती

NHPC Limited – NHPC Bharti 2024 for 89 Trainee Engineer, & Trainee Officer Posts NHPC Recruitment …

(Indian Navy) भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2024)

Indian Navy B.Tech Entry Scheme 2024. Indian Navy (Bhartiya NauSena). Indian Navy Recruitment 2023 (Indian …