Breaking News

महत्वाची सूचना/ Important Notice

Majhi Naukri December 23, 2024

नमस्कार प्रिय वाचकांनो, 

   सध्या बोगस नोकरी संदर्भातील जाहिरातीचा सुळसुळाट चालू आहे. हो, सुळसुळाटच म्हणावं लागेल, कारण तुम्ही खूप वेळा पाहिलं असेलच काही वेबसाईटवर सामान्य जनतेची दिशाभूल होईल अश्या नोकरी विषयक जाहिराती सर्रास प्रसिद्ध केल्या जातात  त्यामुळे योग्य खात्री करूनच अर्ज करावा. माझी नोकरी वाचकांची फसवणूक होऊ नये या करता आम्ही नोकरीच्या जाहिरातीची पूर्णपणे शहनिशा करून झाल्या नंतरच ती जाहिरात आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करीत आलो आहोत, आणि यापुढे ही करणार. ह्या सर्व शहनिशा करण्यामध्ये एखादी जाहिरात उशिरा प्रसिद्ध होते. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. एखाद्या जाहिरातीबद्दल शंका असल्यास कृपया आम्हाला ‘प्रतिक्रिया‘ मधून जरूर कळवा. आणखी एक महत्त्वाचे; ज्या नोकरींच्या जाहिरातीचा महाराष्ट्रातील वाचकांना खरोखरच उपयोग होणार असेल अश्याच जाहिराती आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातात. उदाहरणार्थ : एखादी जाहिरात फक्त 1 किंवा 2 जागेसाठी असेल तसेच एखाद्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नसेल तर ती जाहिरात आम्ही प्रसिद्ध करीत नाहीत.

या कार्यात आपले सहकार्य मिळेल अशी आशा करतो. 

आपला;

सचिन सावंत;

संस्थापक/संचालक – माझी नोकरी

Share this: